सॉफ्टवेअर अद्ययावतामध्‍ये समाविष्‍ट असू शकते, परंतु निम्नलिखितमध्ये मर्यादित नाही
आपल्‍या उपकरणावरून अधिक उत्‍तम प्राप्‍त करण्‍यासाठी, कृपया आपले उपकरण अद्ययावत ठेवा आणि नियमितपणे सॉफ्टवेअर अद्ययावतांसाठी तपासा.

Galaxy Tab S9 FE 5G(SM-X516B)


बिल्‍ड क्रमांक : X516BXXS8CYG1
Android आवृत्ती : V(Android 15)
रिलीज तारीख : 2025-07-22
Security patch level : 2025-07-01
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

हे बदल मॉडेल, देश किंवा ग्राहक वातावरणाचा नेटवर्क ऑपरेटर यांनुसार वेगवेगळे असू शकतात.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXU7CYE1
Android आवृत्ती : V(Android 15)
रिलीज तारीख : 2025-05-26
Security patch level : 2025-04-01
One UI 7.0 अद्यतन (एनड्रॉइड 15)



उठून दिसणारे नवीन रूप

दृश्य सुधारणा
अधिक अत्याधुनिक आणि अद्वितीय रूपाचा आनंद घ्या. One UI 7 बटणे, मेनू, नोटिफिकेशन्स आणि कंट्रोल बार यासह प्रमुख घटकांसाठी एक आश्चर्यकारक पुनर्रचना सादर करते, वक्र आणि वर्तुळांसह अधिक सुसंगत दृश्य अनुभव प्रदान करते. सुंदर नवीन रंग, सॉफ्ट एनिमेशन आणि One UI साठी अद्वितीय असलेला नाविन्यपूर्ण ब्लर इफेक्ट माहिती पदानुक्रम अधिक स्पष्ट करतो आणि तुम्हाला महत्त्वाच्या माहितीवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करतो.

पुनर्कल्पित मुख्य स्क्रीन
नवीन दृश्य मेटाफोर्स आणि रंग योजनांसह नवीन ऍप आयकॉन्स तुमच्या मुख्य स्क्रीनवर छान दिसतील ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेले ऍप ओळखणे सोपे होईल. विजेट्सची अधिक रंगीत प्रतिमा आणि अधिक सुसंगत मांडणीसह पूर्णपणे पुनर्रचना केली गेली आहे. तुमच्या मुख्य स्क्रीनवरील फोल्डर देखील मोठे केले जाऊ शकतात जेणेकरुन तुम्ही प्रथम फोल्डर न उघडता ऍप्समध्ये त्वरित प्रवेश करू शकता.

सरलीकृत मुख्य स्क्रीन ग्रिड
तुमची मुख्य स्क्रीन आता आधीपेक्षा चांगली दिसते. नवीन स्टँडर्ड ग्रिड लेआउट गोष्टी सममित ठेवते आणि स्टँडर्ड आकारांमध्ये One UI विजेट्स वापरणे सोपे करते.

पोर्टेट/लॅंडस्केप मुख्य स्क्रीन सानुकूलन
तुम्ही तुमचा टॅबलेट कसाही धरला असला तरीही तुमचा मुख्य स्क्रीन सर्वोत्तम दिसतो. तुम्ही तुमचे पोर्ट्रेट आणि लँडस्केप मुख्य स्क्रीन लेआउट स्वतंत्रपणे सानुकूल करू शकता. समान ऍप्स आणि विजेट्स दोन्ही लेआउटमध्ये दिसतील, परंतु तुम्ही त्यांना हलवू शकता आणि त्यांचा आकार स्वतंत्रपणे बदलू शकता.

तुमचे ऍप्स आणि विजेट शैली सानुकूल करा
तुमची मुख्य स्क्रीन तुम्हाला आवडेल तशी बनवा. तुम्ही आता ऍप्स आयकॉन्सचा आकार ॲडजस्ट करू शकता आणि ऍप आयकॉन आणि वैशिष्ट्यीकृत विजेट्सच्या खाली टेक्स्ट लेबले दाखवायची की नाही हे निवडू शकता. तुम्ही प्रत्येक विजेटसाठी सेटिंग्समध्ये आकार, पार्श्वभूमी रंग आणि पारदर्शकता देखील ॲडजस्ट करू शकता.

कार्यपट्टी स्वयं लपवा
तुम्ही ऍप्स उघडता तेव्हा कार्यपट्टी आपोआप लपवून तुमच्या ॲप्ससाठी अधिक स्क्रीन स्पेस वाचवा. ते परत येण्यासाठी, स्क्रीनच्या तळापासून हळूहळू वर स्वाइप करा.



स्क्रीन लॉक करा

Now bar सह महत्त्वाच्या कार्यांमध्ये शीर्षस्थानी रहा.
तुमचा टॅबलेट अनलॉक न करता तुम्हाला आवश्यक असलेली माहिती आत्ताच तपासा आणि आवश्यक वैशिष्ट्ये सुरू करा. चालू असलेली कामे तुमच्या लॉक स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Now bar मध्ये दिसतील जेणेकरून तुम्ही महत्त्वाची माहिती लगेच तपासू शकाल. माहितीमध्ये मीडिया नियंत्रक, स्टॉपवॉच, टाइमर, आवाज रेकॉर्डर, Samsung Health, आणि अजून बरेच काही समाविष्ट आहे.

तुमचे घड्याळ तुम्हाला हवे तसे बनवा
तुमच्या लॉक स्क्रीनसाठी विविध प्रकारच्या नवीन घड्याळ शैली शोधा. तुम्ही डीफॉल्ट घड्याळ शैलीमध्ये रेषांची जाडी ॲडजस्ट करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार नवीन एनिमेटेड घड्याळांपैकी एक वापरून पाहू शकता. तुम्ही तुमच्या घड्याळाचा आकार तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही आकारात बदलू शकता आणि लॉक स्क्रीनवर तुमच्या इच्छित स्थानावर ड्रॅग करू शकता.

अधिक विजेट्स आणि शॉर्टकट्स
तुमचा टॅबलेट लॉक असतानाही तुम्ही आता बरेच काही पाहू शकता आणि करू शकता. तुमच्या गॅलरीमधील चित्रे आणि कथा दाखवण्यासाठी विजेट जोडा किंवा पटकन स्वाइप करून QR कोड स्कॅनर उघडणारा शॉर्टकट वापरून पहा.



त्वरित पॅनेल आणि अधिसूचना

स्वतंत्र अधिसूचना आणि त्वरित पॅनेल
त्वरित सेटिंग्ससाठी अधिक जागेसह तुम्हाला आवश्यक असलेल्या पॅनेल ऍक्‍सेस करा. त्वरित सेटिंग्स पॅनेल उघडण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातून खाली स्वाइप करा. अधिसूचना पॅनेल उघडण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या बाजूला कोठूनही खाली स्वाइप करा.

तुमचे त्वरित पॅनेल सानुकूल करा
तुमच्यासाठी योग्य असलेला त्वरित पॅनेल लेआउट तयार करा. संपादन मोडमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही त्वरित पॅनेलच्या शीर्षस्थानी असलेल्या पेन्सिल आयकॉन वर टॅप करू शकता, नंतर बटणे आणि नियंत्रणे तुमच्या प्राधान्यांशी जुळण्यासाठी वर आणि खाली हलवू शकता.

थेट अधिसूचना
आत्ता काय घडत आहे त्याच्याही वर रहा. थेट अधिसूचना तुम्हाला टायमर, आवाज रेकॉर्डिंग, व्यायाम आणि बरेच काही यासारख्या चालू क्रियाकलापांची प्रगती दर्शवतात जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी संबंधित त्वरित क्रिया करू शकता. थेट अधिसूचना लॉक स्क्रीनवरील Now bar मध्ये, स्थिती पट्टीवर आणि अधिसूचना पॅनेलच्या शीर्षस्थानी दिसतील.

नवीन नोटिफिकेशन लेआउट
अधिसूचनांवरील आयकॉन्स आता तुमच्या मुख्य स्क्रीनवर दिसणाऱ्या आयकॉन्ससारखेच आहेत, ज्यामुळे प्रत्येक अधिसूचना कोणत्या ऍपने पाठवली हे ओळखणे सोपे होते. गटबद्ध अधिसूचना कार्डांच्या स्टॅकच्या रूपात दिसतात. गटातील सर्व अधिसूचना दर्शविण्यासाठी स्टॅकवर टॅप करा.



उपयुक्त माहितीमध्ये त्वरित प्रवेश करा

Google Gemini मध्ये प्रवेश करण्यासाठी साइड बटण दाबा आणि होल्ड करा
साइड बटण हा कॉर्नर स्वाइप वापरण्याऐवजी Google Gemini किंवा इतर डिजिटल असिस्टंट ऍपवर त्वरीत प्रवेश करण्याचा नवीन मार्ग आहे. तुम्ही सेटिंग्समध्ये साइड बटण काय करते ते बदलू शकता.

एकदा विचारून अनेक कार्ये पूर्ण करा
Google Gemini आता दिनदर्शिका, Notes, Reminder आणि घड्याळ यासारख्या सॅमसंग ॲप्ससह अखंडपणे एकत्रित केले आहे. तुम्ही एका सोप्या आदेशाने Gemini मधील माहिती वापरून या ऍप्समधील कार्ये पूर्ण करू शकता. Google Gemini ला YouTube व्हिडिओबद्दल विचारण्यास सांगण्याचा प्रयत्न करा आणि Samsung Notes मध्ये परिणाम जतन करा किंवा Google Gemini ला तुमच्या आवडत्या क्रीडा संघाचे शेड्यूल शोधण्यासाठी आणि तुमच्या दिनदर्शिकेमध्ये खेळ जोडण्यास सांगा.

त्याला वर्तुळ करा, त्याला शोधा. त्याला ऐका, त्याला शोधा
Google सह शोधण्यासाठी वर्तुळ काढा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर काहीही शोधण्याची आणि AI सम्यग्दर्शनसह जलद माहिती मिळवण्याची अनुमती देते. प्रतिमा, व्हिडिओ किंवा मजकूर यांसह—फक्त वस्तूवर वर्तुळ काढा आणि तुम्हाला लगेच परिणाम मिळतील. तुम्ही ऍप्स स्विच न करता क्षणात ऐकू येणारे गाणे देखील शोधू शकता.



सहजतेने प्रतिमा कॅप्चर करा

नवीन कॅमेरा लेआउट
तुम्हाला आवश्यक असलेली वैशिष्ट्ये शोधणे सोपे करण्यासाठी आणि तुम्ही घेत असलेल्या चित्राचे किंवा तुम्ही रेकॉर्ड करत असलेल्या व्हिडिओचे स्पष्ट पूर्वावलोकन देण्यासाठी कॅमेरा बटणे, नियंत्रणे आणि मोडची पुनर्रचना केली गेली आहे.

मोड निवड सुधारणा
अधिक मोड्स मेनू पुन्हा डिजाइन केला गेला आहे. संपूर्ण स्क्रीन भरण्याऐवजी आणि कॅमेरा दृश्य अवरोधित करण्याऐवजी, तुम्ही आता एका छोट्या पॉप-अपमधून एक मोड निवडू शकता जो फक्त स्क्रीनच्या तळाला कव्हर करेल.

श्रेणीवाढ केलेला फिल्टर अनुभव
कॅमेरा फिल्टर पूर्णपणे सुधारित केले आहेत. नवीन फिल्टर आता उपलब्ध आहेत आणि विद्यमान फिल्टर सुधारित केले गेले आहेत. प्रत्येक फिल्टर तीव्रता, रंग तापमान, कॉन्ट्रास्ट आणि संपृक्तता यांचे फाइन-ट्यून ॲडजस्ट करण्यास अनुमती देते, ज्यामुळे तुम्हाला हवा असलेला लुक मिळणे सोपे होते. तुम्ही निवडलेल्या चित्रांच्या शैली आणि मूडवर आधारित तुम्ही सानुकूल फिल्टर देखील तयार करू शकता.

व्हिडिओ रेकॉर्ड करताना ऑडिओ प्ले करा
तुम्ही आता संगीत, पॉडकास्ट किंवा तुम्ही ऐकत असलेल्या इतर ऑडिओ सामग्रीमध्ये व्यत्यय न आणता व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. फक्त अत्याधुनिक व्हिडिओ पर्यायांमध्ये ऑडिओ प्लेबॅक चालू करा.

अचूक चित्रीकरण लाइन अप करा
ग्रिड लाइन्स आणि लेव्हल्ससह कॅमेराची स्थिती ॲडजस्ट करण्यात मदत मिळवा. ग्रिड लाइन्स आता क्षैतिज लेव्हलपासून स्वतंत्रपणे चालू आणि बंद केल्या जाऊ शकतात. उभी लेव्हल दर्शविण्यासाठी एक नवीन पर्याय देखील आहे.



तुमच्या खास क्षणांचा आनंद घ्या

फ्री-फॉर्म कोलाजेस
गॅलरीमधील कोलाजसाठी प्रीसेट लेआउटच्या पलीकडे जा. तुमचा स्वतःचा अद्वितीय लेआउट तयार करण्यासाठी तुम्ही आता तुमच्या कोलाजमधील प्रतिमांचा आकार, स्थिती आणि रोटेशन ॲडजस्ट करू शकता.

कथांमध्ये कोलाज संपादित करा
तुमच्या कथेचा कोलाज तुम्हाला आवडेल तसा बनवा. तुमच्याकडे आता कथांमध्ये तयार केलेले कोलाज संपादित करण्याचे पूर्ण नियंत्रण आहे. प्रतिमा बदला, प्रतिमा काढा किंवा जोडा किंवा स्थिती आणि आकार ॲडजस्ट करा.



शक्तिशाली व्हिडिओ संपादन

तुमची संपादने सहजपणे पूर्ववत करा
चुका करण्याची चिंता करू नका. परिवर्तन, फिल्टर आणि टोन बदल यासारख्या कार्यांसाठी व्हिडिओ संपादित करताना पूर्ववत करा आणि पुन्हा करा पर्याय उपलब्ध आहेत.

तुमचे व्हिडिओस एनिमेट करा
स्टुडिओमधील तुमच्या व्हिडिओंमध्ये स्टिकर्स आणि टेक्स्टवर मजेचे एनिमेशन प्रभाव जोडा. फेड इन, फेड आउट, वाइप, रोटेशन आणि बरेच काही मधून निवडा.



तुमचे आरोग्य व्यवस्थापित करा

सजग राहा
Samsung Health मधील नवीन माइंडफुलनेस वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातील ताण आणि चिंता व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. तुमच्या मनःस्थिती आणि भावनांचा मागोवा ठेवा, श्वसनाचे व्यायाम आणि ध्यान आणि बरेच काही करा.

नवीन Samsung Health बॅजेस
Samsung Health मध्ये नवीन बॅज मिळवताना प्रेरित राहा आणि तुमच्या आरोग्याच्या उद्दिष्टांसाठी कार्य करा. ऊर्जा स्कोअर, व्यायाम, क्रियाकलाप, अन्न, पाणी, शरीर संरचना आणि बरेच काही यासाठी नवीन बॅजेस मिळविण्यासाठी स्वतःला आव्हान द्या.



तुमची उत्पादकता वाढवा

लहान ऍप्ससाठी पूर्वावलोकने
जेव्हा एकाच ॲपवरील एकाधिक पॉप-अप विंडो मिनिमाइज केल्या जातात, तेव्हा त्या एकाच आयकॉनमध्ये एकत्र केल्या जातील. आयकॉनवर टॅप केल्याने ऍपमधील सर्व खुल्या विंडोचे पूर्वावलोकन दिसेल, ज्यामुळे तुम्हाला हवी असलेली विंडो सहज निवडता येईल.

तुमचे अलार्म्स गटबद्ध करा
तुम्ही क्लॉक ऍपमध्ये एकत्रितपणे नियंत्रित करू इच्छित असलेल्या अलार्म्सचे गट तयार करा. तुम्ही एकाच टॅपसह एका गटातील सर्व अलार्म्स बंद करू शकता.

तुमचे सर्व अलार्म्स एकाच आवाजात ठेवा
सोप्या सेटअपसाठी, तुमचे सर्व अलार्म्स डिफॉल्टनुसार सारखा आवाज वापरतील. तुम्ही प्रत्येक अलार्मसाठी वेगवेगळे आवाज सेट करण्यास प्राधान्य दिल्यास, तुम्ही हे घड्याळ सेटिंग्समध्ये निवडू शकता.

सुधारित फाइल निवड
नवीन फाइल पिकर विविध ऍप्समध्ये फायली संलग्न करणे आणि निवडणे सोपे करते. विविध संग्रह स्थाने आणि श्रेणींमध्ये स्विच करणे सोपे आहे आणि तुम्हाला योग्य फाइल मिळाल्याची खात्री करण्यासाठी पूर्वावलोकने दाखवली जातात.

मोठ्या स्क्रीनवर अधिक पहा
माझ्या फाइल्स तुम्हाला मोठ्या स्क्रीन उपकरणावर पूर्वीपेक्षा अधिक पाहू देते. स्क्रीनच्या उजव्या बाजूला, तुम्ही फाइल पाथ, आकार आणि फेरबदल तारखेसह समर्थित फाइल्सचे पूर्वावलोकन पाहू शकता.

रूटीनसाठी प्रगत पर्याय
तुम्हाला हवे असलेले जवळजवळ काहीही करण्यासाठी तुमच्या टॅबलेटला प्रोग्राम करा. जर-तर तर्कशास्त्र आणि व्हेरिएबल्स म्हणून डेटा मिळविण्याच्या क्षमतेमुळे रूटीन पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.



कार्ये आणि उपक्रमांची योजना करा

दिनदर्शिका उपक्रम सहजपणे पुन्हा शेड्यूल करा
उपक्रमाची तारीख बदलण्यासाठी तुमच्या दिनदर्शिकेमध्ये महिना व्ह्यूमध्ये उपक्रम एका तारखेपासून दुसऱ्या तारखेपर्यंत ड्रॅग आणि ड्रॉप करा.

विजेट्सवर वेगळी दिनदर्शिका दाखवा
तुमच्या दिनदर्शिका विजेट्सवर कोणती दिनदर्शिका दिसावी यावर आता तुमचे अधिक नियंत्रण आहे. तुम्ही फक्त एक दिनदर्शिका निवडू शकता आणि त्यातून तुमच्या मुख्य स्क्रीनवर फक्त उपक्रम दाखवू शकता किंवा प्रत्येकावर वेगळ्या दिनदर्शिकेसह 2 वेगळे दिनदर्शिका विजेट तयार करू शकता.

महत्त्वाच्या उपक्रमासाठी दिवस मोजा
तुमच्या दिनदर्शिकेवरील उपक्रमासाठी काउंटडाउन विजेट तयार करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे. उपक्रम तपशीलांवर जा, नंतर अधिक पर्याय मेनूमधून काउंटडाउन विजेट जोडा निवडा. तुमचा वाढदिवस, वर्धापन दिन, सुट्टी किंवा तुम्ही निवडलेल्या इतर कोणत्याही उपक्रमापर्यंत दिवसांची संख्या दर्शवणारे विजेट तुमच्या मुख्य स्क्रीनवर दिसेल.

सर्व उपक्रम एका दिनदर्शिकेमधून दुसऱ्या दिनदर्शिकेमध्ये हलवा
एका वेळी एक उपक्रम हलवण्याचा त्रास टाळा. तुम्ही आता सर्व उपक्रम एका दिनदर्शिकेमधून दुसऱ्या दिनदर्शिकेमध्ये हलवू शकता, जसे की तुमच्या टॅबलेटवरील दिनदर्शिकेमधील सर्व उपक्रम क्लाउड-आधारित दिनदर्शिकेमध्ये हलवणे.

Reminders ची पुनरावृत्ती करण्यासाठी अधिक पर्याय
जेव्हा तुम्ही पुनरावृत्ती होणारे Reminder तयार करता तेव्हा, तुम्ही आता पुनरावृत्ती करण्यासाठी फक्त एका ऐवजी अनेक तारखा निवडू शकता.

सुधारित त्वरित जोडा मेनू
आता पटकन Reminders तयार करणे सोपे झाले आहे. त्वरित जोडा मेनू आता वेळ आणि स्थान परिस्थितीसाठी प्रीसेट पर्याय प्रदान करतो.

तुमचे पूर्ण झालेले Reminders व्यवस्थापित करा
तुमच्या Reminder सूचीमधून गोंधळ दूर करणे सोपे आहे. नवीन सेटिंग तुम्हाला ठराविक कालावधीनंतर पूर्ण झालेले Reminders आपोआप हटवू देते. तुम्ही पूर्ण केलेल्या Reminders ची डुप्लिकेट देखील बनवू शकता जेणेकरून तुम्ही पुन्हा सर्व माहिती प्रविष्ट न करता त्यांचा पुन्हा वापर करू शकता.



कनेक्ट करा आणि शेअर करा

जवळपासच्या उपकरणांशी सहजपणे कनेक्ट करा
टीव्ही, फोन, PC, इअरबड आणि यांसारख्या आणखी बऱ्याच सॅमसंग डिव्हाइसशी कनेक्ट करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आहे. तुमच्या जवळपास उपलब्ध असलेलीउपकरणे पाहण्यासाठी त्‍वरित पॅनलमध्ये जवळपासची उपकरणे वर टॅप करा, मग त्वरित कनेक्ट करण्यासाठी तुमच्या टॅबलेट पर्यंत डिव्हाइस ड्रॅग करा. तुमच्या टॅबलेटशी कनेक्ट केले असताना उपलब्ध वैशिष्ट्ये पाहण्यासाठीदेखील तुम्ही डिव्हाइसवर टॅप करू शकता. उदाहणार्थ, तुम्ही टीव्हीवर टॅप करता, तेव्हा तुम्हाला Smart View सुरू करण्यासाठी पर्याय दिसेल.

त्वरित सामायिक करा यासाठी शिफारस केलेली उपकरणे
शेअर करण्यासाठी योग्य उपकरण सहजपणे शोधा. तुमच्या Samsung account मध्ये साइन इन केलेली उपकरणे आणि तुम्ही यापूर्वी शेअर केलेली उपकरणे सूचीच्या शीर्षस्थानी दिसतील जेणेकरून ते शोधणे सोपे होईल.

इंटरनेटवर शेअर करणे सुरू ठेवा
उपकरण एकमेकांपासून दूर असतानाही फाइल ट्रान्सफर पूर्ण करा. त्वरित सामायिक करा वापरून फाइल्स शेअर करताना, थेट स्थानांतर करणे सुरू ठेवण्यासाठी उपकरणे खूप दूर गेल्यास, वाय-फाय किंवा मोबाईल डेटा वापरून इंटरनेटवर स्थानांतर करणे अखंडपणे सुरू राहील.



तुमच्या सुरक्षेचे संरक्षण करा

तुमच्या उपकरणांची सुरक्षा स्थिती तपासा
सुरक्षिततेच्या जोखमींबद्दल जाणून घ्या आणि त्यांचे त्वरीत निराकरण करा. Knox Matrix तुमच्या Samsung account मध्ये साइन इन केलेल्या समर्थित उपकरणांचे निरीक्षण करते आणि तुम्हाला सुरक्षा जोखमी कशा सोडवायच्या ते शोधून देते.

सुरक्षा धोक्यांपासून सुरक्षित रहा
जेव्हा कमाल प्रतिबंध सुरू केलेले असतात तेव्हा सायबर हल्ल्यांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी स्वंय ब्लॉकर आणखी बरेच काही करते. 2G नेटवर्क आता ब्लॉक केले आहेत आणि तुमचा टॅबलेट आपोआप असुरक्षित Wi-Fi नेटवर्कशी पुन्हा कनेक्ट होणार नाही. हे निर्बंध हल्लेखोराला तुमचे नेटवर्क ट्रॅफिक रोखण्यापासून प्रतिबंध करू शकतात.



बॅटरी आणि चार्जिंग

पॉवर सेव्हिंगसाठी अधिक पर्याय
तुमचा टॅबलेट पॉवर सेव्हिंग मोडमध्ये असताना काय होते यावर आता तुमचे अधिक नियंत्रण आहे. तुमच्यासाठी योग्य असलेली बॅटरी वाचवण्यासाठी तुम्हाला मर्यादित करायची असलेली वैशिष्ट्ये निवडा. पॉवर सेव्हिंग चालू असतानाही तुम्ही हे पर्याय बदलू शकता.

बॅटरी संरक्षणावर अधिक नियंत्रण
तुम्ही बॅटरी संरक्षण चालू करता, तेव्हा तुम्ही आता कमाल चार्जिंग पातळी 80% आणि 95% च्या दरम्यान अ‍ॅडजस्ट करू शकता.

नवीन चार्जिंग प्रभाव
जेव्हा तुम्ही चार्जर प्लग इन करता, तेव्हा चार्जिंग पुष्टीकरण लहान असते आणि व्यत्यय टाळण्यासाठी स्क्रीनच्या मध्यभागी ऐवजी तळाशी दिसते आणि तरीही हे चार्जिंग स्थिती तपासणे सोपे करते.



सर्वांना ऍक्‍सेसिबल

फक्त एका बोटाने झूम इन आणि आउट करा
झूम इन आणि आउट करणे सोपे झाले आहे. ज्या लोकांना पिंच झूम वापरण्यात अडचण येत आहे त्यांच्यासाठी, तुम्ही आता सहाय्यक मेनूमधून 1-फिंगर झूम सक्रिय करू शकता. झूम इन करण्यासाठी वर किंवा उजवीकडे स्वाइप करा. झूम आऊट करण्यासाठी खाली किंवा डावीकडे स्वाइप करा.

सुधारित स्क्रीन नियंत्रणे
सहाय्यक मेनू आता तुम्हाला स्क्रीन नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी आणखी काही करतो. तुम्ही आता फक्त एकाच बटणावर टॅप करून दोनदा टॅप करू शकता आणि स्पर्श आणि होल्ड करू शकता. नवीन स्क्रोलिंग नियंत्रणे तुम्हाला स्क्रीनवरील आरंभ आणि शेवटच्या बिंदूंवर टॅप करून विशिष्ट अंतरावर स्क्रीनभोवती फिरू देतात.

तुमचे स्पर्श परस्परसंवाद सानुकूलित करा
तुमच्यासाठी सर्वात सोयीस्कर सेटिंग्स निवडण्यात मदत मिळवा. विलंब स्पर्श आणि होल्ड करा, टॅप कालावधी आणि पुनरावृत्ती स्पर्श सेटिंग्स दुर्लक्षित करण्यासाठी नवीन चाचण्या उपलब्ध आहेत. तुमची वर्तमान सेटिंग्स योग्य आहेत किंवा ॲडजस्टमेंट आवश्यक आहे का हे चाचणी तुम्हाला सांगू शकते.



आणखी अधिक सुधारणा

तुमचा डिजिटल सहाय्यक ऍक्‍सेस करण्यासाठी साइड बटण दाबा आणि होल्ड करा
साइड बटण हा कॉर्नर स्वाइप वापरण्याऐवजी तुमच्या डिफॉल्ट डिजिटल सहाय्यक ऍपवर त्वरित प्रवेश करण्याचा एक नवीन मार्ग आहे. तुम्ही सेटिंग्समध्ये साइड बटण काय करते ते बदलू शकता.

स्मार्ट निवडमध्ये उपयुक्त सूचना मिळवा
जेव्हा तुम्ही स्‍मार्ट निवडसह स्क्रीनचा भाग निवडाल तुमच्या निवडींवर आधारित तुम्हाला उपयुक्त क्रिया सुचवल्या जातील. जर उपक्रम तपशील तुमच्या निवडीचा भाग असतील, तर तुमच्याकडे ते तुमच्या दिनदर्शिकेत जोडण्याचा पर्याय असेल. जर तुम्ही प्रतिमा निवडलीत, तर प्रतिमा संपादित करण्याचे किंवा तिची गुणवत्ता सुधारण्याचे पर्याय सुचवले जातील.

व्हिडिओ पुन्हा पहा
व्हिडिओ प्लेअरमध्ये, प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक बटण दिसेल जे तुम्हाला व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून सुरू करू देते.

सुधारित संपर्क सूची
अधिक सुसंगत अनुभवासाठी, समान संपर्क सूची आता फोन अनुप्रयोग आणि संपर्क अनुप्रयोग दोन्हीमध्ये दिसते. मेनू आणि पर्याय दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत त्यामुळे तुम्ही जे शोधत आहात ते तुम्ही नेहमी शोधू शकता. संपर्क शोधताना, आपण वारंवार शोधलेले संपर्क शोध परिणामांच्या शीर्षस्थानी दिसतात, आपल्याला योग्य व्यक्ती त्वरित शोधण्यात मदत करतात.

क्रियाकलाप पूर्वांदाज
धावणे, बागकाम, कॅम्पिंग आणि बरेच काही यासारख्या बाह्य क्रियाकलापांसाठी हवामान योग्य आहे की नाही हे तपासणे आता सोपे आहे. तुम्ही हवामान ऍपमध्ये दाखवण्यासाठी 3 पर्यंत क्रियाकलाप निवडू शकता.

सानुकूल स्थान लेबले
हवामान ऍपमध्ये वेगवेगळ्या स्थानांचा मागोवा ठेवणे सोपे आहे. घर, ऑफिस, शाळा किंवा तुम्हाला हवामान तपासायचे असलेले इतर कोणत्याही ठिकाणासारख्या तुम्ही जोडता त्या स्थानांवर तुम्ही आता सानुकूल लेबले सेट करू शकता.

तुमच्या गेमिंगला चालना द्या
गेम बूस्टरचे इन-गेम पॅनेल पुन्हा डिझाइन केले गेले आहे, ज्यामुळे कार्य न सोडता पटकन सेटिंग्स बदलणे सोपे होते.

प्रत्येक खेळासाठी कामगिरी सेट करा
गेम बूस्टर आता तुम्हाला प्रत्येक गेमसाठी स्वतंत्रपणे परफॉर्मन्स सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करू देतो. तुम्ही काही गेम उच्च कार्यक्षमतेवर आणि काही जास्त गेमप्लेच्या वेळेसाठी बॅटरी वाचवण्यासाठी सेट करू शकता. तुमच्यासाठी सर्वोत्तम काम करणाऱ्या सेटिंग्स शोधा.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXS7BYB7
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2025-02-27
Security patch level : 2025-02-01
• स्थैर्य आणि विश्वसनीयता
उपकरणाचे काम सुधारलेले आहे
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXU7BXL8
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2025-01-13
Security patch level : 2024-12-01
• स्थैर्य आणि विश्वसनीयता
उपकरणाचे काम सुधारलेले आहे
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXU7BXK1
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-12-11
Security patch level : 2024-11-01
• स्थैर्य आणि विश्वसनीयता
उपकरणाचे काम सुधारलेले आहे
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXS6BXJ1
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-10-24
Security patch level : 2024-10-01
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXU5BXHB
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-09-30
Security patch level : 2024-08-01
One UI 6.1.1 अद्यतन



अधिक उत्पादक रहा

स्‍मार्ट निवडसाठी सुचवलेल्या कृती
तुमच्या स्क्रीनवर काय दाखवले जाते त्या आधारे पटकन कृती करा. जेव्हा तुम्ही स्‍मार्ट निवडसह तुमच्या स्क्रीनवर काहीतरी निवडता, तेव्हा आता तुम्हाला तुमच्या निवडीशी संबंधित सुचवलेल्या कृती मिळतील. तुम्ही फोन नंबर्सवर पटकन कॉल करू शकता, पत्ते शोधू शकता, प्रतिमा वर्धित करू शकता आणि अधिक. आता Apps edge पॅनेलमध्ये स्‍मार्ट निवड ऍक्सेस करता येते.

मल्टि विंडो अनुभव वर्धित करा
चित्र-इन-चित्र आणि स्प्लिट स्क्रीनमध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे आहे. चित्र-इन-चित्रमध्ये प्ले होत असलेल्या व्हिडिओला स्पर्श करा आणि होल्ड करा, नंतर तुम्हाला तो जिथे प्ले करायचा आहे तिथे स्क्रीनच्या कडेला ड्रॅग करा.

अधिक सुलभ फाइल कॉपी करणे आणि हलवणे
My Files मध्ये फाइल कॉपी करताना किंवा हलवताना योग्य फोल्डर शोधणे पूर्वीपेक्षा सोपे आहे. तुम्ही आता पॉप-अप विंडोमध्ये लक्ष्यित फोल्डर निवडू शकता जेणेकरून तुम्ही पूर्ण झाल्यावर मूळ फोल्डर सहजपणे परत करू शकता.

मुख्‍य स्‍क्रीनवर फाइल शॉर्टकट तयार करा
तुम्ही सर्वात जास्त वापरत असलेल्या फाइल्सवर पटकन ऍक्सेस मिळवा. माझ्या फाइल्समध्ये कोणत्याही फाइलला स्पर्श करा आणि होल्ड करा, नंतर मुख्‍य स्‍क्रीनवर नेव्हिगेट करण्यासाठी तुमचा दुसरा हात वापरा. फाइलसाठी शॉर्टकट तयार करण्यासाठी तुमच्या मुख्‍य स्‍क्रीनवर कुठेही फाइल ड्रॉप करा.

सुधारीत थंबनेल प्रतिमा प्रदर्शन
तुम्ही प्रतिमा उघडण्यापूर्वी त्या कशा दिसतील ते पाहा. माझ्या फाइल्समधील चित्रे आणि व्हिडिओंसाठी थंबनेल प्रतिमा आता मूळ अनुपात गुणोत्तरामध्ये दिसतात.

तुमचे शेड्यूल हायलाईट करा
तुमच्या दिनदर्शिकेवर महत्त्वाच्या तारखा झटपट आणि व्यवस्थित चिन्हांकित करा. महिना दृश्यामध्ये महत्त्वाच्या तारखा चिन्हांकित करण्यासाठी तुमच्या S Pen सह सरळ-रेष हायलाइटर वापरा. पेनाच्या इतर खुणा न मिटवता सुद्धा तुम्हाला हायलाईट केलेले विभाग मिटवता येतात.

मेसेज फिल्‍टर करण्याचे अधिक पर्याय
तुम्हाला मेसेज किंवा अधिसूचना प्राप्त झाल्यावर सुरू होणारे रूटीन तुम्ही तयार करता, तेव्हा तुमच्याकडे आता जास्त फाइन-ट्यून नियंत्रण असते. आता तुम्ही अनेक कीवर्ड्स जोडू शकता आणि सर्व कीवर्ड्स समाविष्ट केले जातात किंवा मेसेज किंवा अधिसूचनेमध्ये कोणताही कीवर्ड समाविष्ट केला जातो तेव्हा तुम्ही रूटीन सुरू करायची निवड करू शकता.



महान प्रतिमा तयार करा

फक्त तुम्हाला जे हवे आहे तेवढेच क्लिप करा
कोणत्याही फोटोतील व्यक्ती किंवा वस्तूला क्लिप करण्यासाठी स्पर्श करा आणि होल्ड करा. आता तुम्ही अनेक आयटम एकदम क्लिप करू शकता. क्लिप केल्यानंतर, तुम्ही तुमची निवड सहजपणे स्टिकरमध्ये बदलू शकता किंवा ते कॉपी करून अन्यत्र पेस्‍ट करू शकता.



आणखी अधिक सुधारणा

तुमचे प्रोफाइल कार्ड डिझाईन आणि शेअर करा
तुमचे नाव आणि चित्रासह तुमचे स्वतःचे प्रोफाइल कार्ड डिझाईन करा, जे तुम्ही इतर Galaxy प्रयोक्त्यांना कॉल करता तेव्हा किंवा ते तुमची संपर्क माहिती पाहतात, तेव्हा त्यांना पाहता येईल. तुमच्या संपर्कातील इतर लोकांसाठी सुद्धा तुम्ही प्रोफाइल कार्डे तयार करू शकता ज्यायोगे ते तुम्हाला कॉल करतील तेव्हा तुम्ही त्यांचे कार्ड पाहू शकाल.

व्हिडिओंमधून झटपट स्किम करा
व्हिडिओ प्लेअर ऍपमध्ये नवीन व्हिडिओ शोध नियंत्रणांसह वेळ आणि प्रयत्न वाचवा. 5 सेकंद पुढे जाण्यासाठी स्क्रीनच्या उजव्या बाजूला दोनदा टॅप करा. 5 सेकंद मागे जाण्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला दोनदा टॅप करा.

स्वाईप करण्याऐवजी टॅपने कॉल्सना उत्तर द्या
तुम्हाला स्वाईप करण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही तुमचा टॅबलेट बटणाच्या साध्या टॅपने उत्तर देण्यासाठी सेट करू शकता.

वरचेवर हवामान अद्यतने मिळवा
हवामानातील अचानक बदलासाठी सज्ज रहा. तुमच्याकडे नेहमी ताजे अंदाज असतील हे सुनिश्चित करण्यासाठी आता हवामान माहिती दर तासाने किमान एकदा आपोआप अद्ययावत होते.

अतिरिक्त भक्कम सुरक्षा
तुमच्या विशेष सुरक्षा गरजा असल्यास, मालवेअर आणि सुरक्षा धोक्यांपासून सर्वोच्च स्तराचे संरक्षण मिळवण्यासाठी कमाल प्रतिबंध लागू करण्याकरिता तुम्ही आता स्वयं ब्लॉकर सेट करू शकता. संदेशांतील हायपरलिंक्स आणि आपोआप डाउनलोड होणारे संलग्नक अवरोधित केले जातात, चित्रे शेअर करताना स्थान डेटा काढला जातो आणि गॅलरीतील शेअर केलेला अल्बम वापरता येत नाही.

वर्धित सहाय्यक मेनू
आता केवळ एका टॅपने तुम्ही त्‍वरित पॅनेल उघडू शकता. भौतिक बटणांचेही तुमच्याकडे जास्त चांगले नियंत्रण असते. दाबणे आणि होल्ड करणे यासाठी सहाय्यक मेनू वापरा किंवा साईड बटण दोनदा दाबा.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXU5BXGE
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-08-22
Security patch level : 2024-07-01
• शोधण्यासाठी वर्तुळ काढा
गुगलसह शोधण्यासाठी वर्तुळ काढा मुळे तुम्हाला अनुप्रयोग स्विच करावे न लागता तुमच्या स्क्रीनवर दाखवलेल्या कशाबद्दलही सहज अधिक जाणून घेता येते. फक्त होम बटण किंवा नेव्हिगेशन हँडलला स्पर्श करून होल्ड करा, नंतर गुगल शोध सुरू करण्यासाठी स्क्रीनवरील कशालाही वर्तुळ करा.
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXS4BXE2
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-06-03
Security patch level : 2024-05-01
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXU3BXDG
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-05-20
Security patch level : 2024-04-01
One UI 6.1 अपग्रेड



भव्य प्रतिमा तयार करा

एका इमेजवरून दुसरीवर कॉपी करा आणि पेस्‍ट करा
तुमच्या चित्रामध्ये गहाळ घटक जोडा. गॅलरीमधील एखाद्या प्रतिमेतील एखादा घटक क्लिप करा, नंतर तो तुम्हाला जिथे पेस्ट करायचा आहे त्या प्रतिमेवर जा आणि अधिक पर्याय मेनूमध्ये क्लिपबोर्डमधून पेस्ट निवडा.

अधिक अचूक प्रतिमा क्लिपिंग
नको असलेल्या भागांविना तुम्हाला हवा असलेला अचूक भाग मिळवा. जेव्हा तुम्ही गॅलरीतील प्रतिमा क्लिप करता, तेव्हा निवडलेला भाग जतन करण्यापूर्वी तो संपादित करण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो, ज्यायोगे तुम्हाला तुमची निवड अगदी अचूक मिळू शकते.

सुधारित गॅलरी शोध
शोध स्क्रीन वापरायला सुलभ करण्यासाठी त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. निकालांच्या आता प्रकारानुसार वर्गवारी करण्यात आल्या आहेत, जसे की लोक, स्‍थाने, अल्बम किंवा कथा.

प्लेबॅक वेग बदला
तुम्ही गॅलरीमध्ये व्हिडिओ संपादित करता तेव्हा प्लेबॅक वेग बदलण्यास आता अधिक व्हिडिओ सहयोग करतात. तुम्ही निवडलेल्या विशिष्ट विभागात किंवा संपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही तुमचा व्हिडिओ अधिक वेगाने किंवा अधिक संथ गतीने प्ले करू शकता.

एकाधिक उपकरणांवर व्हिडिओ संपादित करा
आता तुम्ही तुमचा फोन, टॅबलेट किंवा PC वर तुमची संपादने चालू ठेवू शकता. अन्य गॅलेक्‍सी उपकरणावर उघडता येणाऱ्या फाईलमध्ये तुमचे स्‍टुडिओ प्रोजेक्‍ट निर्यात करा.



तुमचा Galaxy सानुकूल करा

नवीन वॉलपेपर संपादन वैशिष्ट्ये
तुमचा वॉलपेपर तुम्हाला आवडेल तसा सजवा. तुमचा वॉलपेपर म्हणून वापरण्याकरिता जेव्हा तुम्ही एखादी प्रतिमा निवडता, तेव्हा आता तुम्ही फ्रेम्स आणि प्रभाव लागू करू शकता. जेव्हा तुमच्या वॉलपेपरमध्ये एखादी व्यक्ती किंवा प्राणी समाविष्ट असतो, तेव्हा तो विषय पार्श्वभूमीपासून वेगळा उठून दिसण्यासाठी तुम्ही खोलीचे प्रभाव लागू करू शकता.

तुमच्या लॉक स्क्रीनसाठी अधिक विजेट
तुमचा लॉक स्क्रीन आणि Always On Display साठी अतिरिक्त विजेट उपलब्ध आहेत, ज्यायोगे तुमचा फोन अनलॉक न करता तुम्ही पटकन उपयुक्त माहिती तपासू शकता. नवीन विजेटमध्ये हवामान, Samsung Health, बॅटरी, रिमाइंडर, दिनदर्शिका आणि घड्याळ यांचा समावेश होतो.

अलार्म सतर्क सानुकूल करा
प्रत्येक अलार्मसाठी तुमचे स्वतःचे सानुकूल सतर्क स्क्रीन तयार करण्यासाठी प्रतिमा, व्हिडिओ किंवा AR इमोजी वापरा. स्क्रीनवर अलार्म माहिती कुठे दिसते त्याचा लेआउट सुद्धा तुम्ही बदलू शकता.

तुमची दिनदर्शिका पर्सनलाइझ करण्यासाठी अधिक स्टिकर्स
तुमच्या दिनदर्शिकेवर प्रत्येक तारखेसाठी तुम्ही 2 पर्यंत स्टिकर्स जोडू शकता. उपक्रमांसाठीचे स्टिकर्स आता महिन्याच्या दृश्यामध्ये उपक्रमाच्या नावाशेजारी दाखवले जातात.

सुधारित दिनदर्शिका सेटिंग्स
दिनदर्शिका सेटिंग्स अधिक अंतर्ज्ञानी करण्यासाठी त्यांची पुनर्मांडणी करण्यात आली आहे. पूर्ण स्क्रीन दिनदर्शिका सतर्कांसाठी तुम्ही पार्श्वभूमी रंग आणि प्रतिमा सुद्धा सेट करू शकता.

रिमाइंडर सतर्क सानुकूल करा
तुमच्या प्रत्येक रिमाइंडरसाठी बरोबर पार्श्वभूमी तयार करा. आता पूर्ण स्क्रीन रिमाइंडर सतर्कांसाठी तुम्ही रंग आणि पार्श्वभूमी प्रतिमा सेट करू शकता.

रिमाइंडर वर्गवारींसह अधिक करा
प्रत्येक रिमाइंडर वर्गवारीसाठी आता तुम्ही प्रातिनिधिक आयकॉन निवडू शकता. तुम्ही वारंवार वापरत असलेल्या वर्गवारी सुद्धा तुम्ही वर्गवारी सूचीच्या वर पिन करू शकता.

मुख्य स्‍क्रीनवरून मोड चालू किंवा बंद करा
मोड आधीपेक्षा अधिक पटकन चालू किंवा बंद करा. नवीन मोड विजेटमुळे तुम्हाला तुमच्या मुख्य स्‍क्रीनवर थेट मोड जोडता येतात.

तुमच्या मोडचा क्रम नव्याने लावा
मोड आणि रूटीनमध्ये मोड टॅबवर ज्या क्रमाने मोड सूचीबद्ध असतात त्याचा क्रम आता तुम्ही बदलू शकता.

नवीन रूटीन शर्ती
तुमच्या पसंतीचा अलार्म्स वाजायला लागतो किंवा जेव्हा Smart View कनेक्‍ट किंवा डिस्कनेक्ट होतो, तेव्हा तुम्ही आता रूटीन सुरू करू शकता.

Relumino आउटलाइन
कमी दृष्टी असलेल्या लोकांना वेगळे करता येणे सुलभ करण्यासाठी प्रतिमा आणि व्हिडिओंमधील घटक ठळक करण्याकरिता ऍक्सेसेबिलिटी सेटिंग्समध्ये Relumino आउटलाइन चालू करा.



कनेक्ट करा आणि शेअर करा

अधिक उपकरणांसह शेअर करा
त्वरित सामायिक करा गुगलच्या Nearby Share मध्ये विलीन केलेले आहे. गॅलेक्‍सी उपकरणांबरोबरच, आता इंटरनेट कनेक्शनविना तुम्ही इतर एनड्रॉइड उपकरणांसह शेअर करू शकता.

इंटरनेट टॅब समूह इतर उपकरणांसह सिंक करा
तुम्ही कोणतेही उपकरण वापरत असाल, तरी तुमच्या शेवटच्या ब्राऊज करण्याच्या सत्रादरम्यान तुम्ही जिथे सोडले, तिथून सहजपणे पुन्हा सुरुवात करा. तुम्ही एका उपकरणावर तयार केलेले टॅब समूह तुमच्या Samsung account मध्ये साइन इन केलेल्या इतर गॅलेक्‍सी उपकरणांवर सॅमसंग इंटरनेट मध्ये दिसतील.



तुमच्या डेटाचे संरक्षण करणे

Samsung Cloud मध्ये वर्धित डेटा संरक्षण
तुमच्याशिवाय कोणालाही तुमचा डेटा ऍक्‍सेस करता येणार नाही याबाबत निश्चिंत राहा, अगदी डेटा उल्लंघन झाले तरीही. Samsung Cloud सह सिंक केलेल्या डेटासाठी तुम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन चालू करू शकता.

पासकींसह जलद आणि सुरक्षित साइन इन
पासकी वेब साइन इनसाठी अधिक सुरक्षा प्रदान करतात, यासाठी गुंतागुंतीचे पासवर्ड लक्षात ठेवावे लागत नाहीत. सॅमसंग इंटरनेटमध्ये बायोमेट्रिक प्रमाणनासह समर्थित वेबसाइटवर साइन इन करण्यासाठी पासकी वापरा.



तुमचे आरोग्य व्यवस्थापित करा

व्यायामाचा अनुभव वर्धित करा
Samsung Health मधील तुमच्या मागील धावण्याच्या परिणामांशी स्पर्धा करा आणि तुमची मागील वेळ मागे टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही समाप्त केल्यावर सुरुवातीचा किंवा शेवटचा अनावश्यक वेळ काढण्यासाठी तुम्ही व्यायाम क्रॉप सुद्धा करू शकता.

दररोजच्या क्रियांच्या ध्येयांसाठी अधिक पर्याय
Samsung Health मध्ये तुमची दररोजच्या क्रियेची ध्येये सेट करण्यासाठी आता तुमच्याकडे अधिक पर्याय आहेत. जर तुमच्यासाठी एखादे पाऊल ध्येय योग्य नसेल, तर त्याऐवजी तुम्ही ते बदलून चढलेले मजले किंवा सक्रिय तास यामध्ये बदलू शकता.

सुधारित सायकल ट्रॅकिंग
जेव्हा तुम्ही तुमची शारीरिक लक्षणे आणि मनस्थिती रेकॉर्ड करता, तेव्हा तुम्ही पूर्वी वारंवार वापरलेले पर्याय स्क्रीनच्या वरच्या बाजूला दिसतील. तुम्हाला कसे वाटते आहे याच्याशी डिफॉल्ट पर्याय न जुळल्यास आता तुम्ही सानुकूल मनस्थिती सुद्धा सेट करू शकता.



आणखी अधिक सुधारणा

व्हिडिओ कॉल प्रभाव आणि माईक मोड ऍक्‍सेस करणे अधिक सुलभ
आवाज आणि व्हिडिओ कॉल्स दरम्यान व्हिडिओ कॉल प्रभाव आणि माईक मोड आता त्वरित पॅनेलमध्ये दिसेल ज्यायोगे कॉल दरम्यान इतर तुम्हाला कसे पाहतात आणि ऐकतात ते तुम्ही नियंत्रित करू शकाल. तुम्ही पार्श्वभूमी रंग किंवा प्रतिमा सेट करू शकता, पार्श्वभूमीचे आवाज अवरोधीत करून तुमच्या आवाजावर लक्ष केंद्रित करू शकता आणि अधिक.

हवामान विजेटमध्ये अधिक माहिती
तीव्र गडगडाट, हिमवर्षाव किंवा इतर पर्जन्याचे तुमच्या स्थानिक भागात जेव्हा भाकीत असेल, तेव्हा हवामान विजेट तुम्हाला सांगेल.

कीबोर्ड न सोडता आवाज इनपुट
आवाज इनपुट वापरताना आता कीबोर्ड दिसत राहतो ज्यायोगे तुम्हाला जेव्हाही हवे असेल, तेव्हा तुम्ही परत टायपिंगला स्विच करू शकता. कीबोर्ड वापरत असताना कोणत्याही वेळी तुमचा आवाज वापरून मजकूर प्रविष्ट करण्यासाठी स्क्रीनच्या तळाशी माईक बटण टॅप करा.

स्प्लिट स्क्रीन दृश्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट
एखादा अनुप्रयोग स्क्रीनच्या एकाबाजूला पटकन सरकवा. तुम्ही भौतिक कीबोर्ड वापरत असाल, तर Cmd (Windows) की + Ctrl की + डावी किंवा उजवी बाणाची की दाबा.

सर्व मिनिमाईज केलेले अनुप्रयोग एकाचवेळी उघडा
तुम्ही एकाहून अधिक पॉप-अप विंडो मिनिमाईज केलेली असते, तेव्हा एका नवीन बटणामुळे तुम्हाला सर्व मिनिमाईज केलेले अनुप्रयोग एकाचवेळी उघडता येतात.

Finder मध्ये गुगल शोध सूचना
तुम्ही Finder वापरून शोधता, तेव्हा, तुम्हाला गुगलकडून सुचवलेले वेब शोध सुद्धा मिळतील.

तुमच्या बॅटरीचे संरक्षण करण्याचे अधिक मार्ग
तुमच्या बॅटरीचे जीवनमान वाढविण्यास मदत करण्यासाठी 3 भिन्न संरक्षण पर्यायांतून निवड करा. मुलभूत संरक्षणामुळे तुम्हाला 95% आणि 100% दरम्यान चार्जिंग ठेवता येते. अनुकूल संरक्षण तुम्ही झोपलेले असताना चार्जिंगला विराम देते आणि तुम्ही उठण्याच्या अगदी आधी चार्जिंग समाप्त करते. कमाल संरक्षणासाठी तुम्ही कमाल चार्जिंग जास्तीत जास्त 80% ला मर्यादित करण्याचीही निवड करू शकता.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXS3BXD6
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-04-16
Security patch level : 2024-04-01
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXS2BXA7
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2024-02-06
Security patch level : 2024-01-01
• सुरक्षा
उपकरण सुधारीत सुरक्षेने रक्षित आहे.

बिल्‍ड क्रमांक : X516BXXU1BWK9
Android आवृत्ती : U(Android 14)
रिलीज तारीख : 2023-12-05
Security patch level : 2023-11-01
One UI 6.0 अद्यतन



त्वरीत पॅनेल

नवीन बटण लेआउट
त्‍वरित पॅनेलचा एक नवीन लेआउट आहे ज्यामुळे तुम्ही सर्वात जास्त वापरत असलेल्या वैशिष्ट्यांचा ॲक्सेस सुलभ होतो. Wi-Fi आणि ब्लुटूथसाठी आता स्क्रीनच्या वरच्या बाजूला त्यांची स्वतःची समर्पित बटणे आहेत, तर डार्क मोड आणि डोळ्याच्या आरामाचे शिल्ड यासारखी दृष्टीची वैशिष्ट्ये तळाशी हलवली गेली आहेत. इतर त्वरित सेटिंग्स बटणे मध्ये सानुकूल करता येणाऱ्या क्षेत्रात दिसतात.

पूर्ण त्‍वरित पॅनेल चटकन ॲक्सेस करा
तुम्ही स्क्रीनच्या वरच्या बाजूकडून खाली स्वाईप करता, तेव्हा डिफॉल्टनुसार, एक संक्षिप्त त्‍वरित पॅनेल अधिसूचनांसह दिसेल. पुन्हा खाली स्वाईप केल्यास अधिसूचना लपवल्या जातात आणि विस्तारीत त्‍वरित पॅनेल दिसते. तुम्ही त्वरित सेटिंग्स इन्स्टंट ॲक्‍सेस चालू केल्यास, स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूकडून फक्त एकदा स्वाईप करून तुम्ही विस्तारीत त्वरित पॅनेल पाहू शकता. डावीकडून खाली स्वाईप केल्याने अधिसूचना दिसतात.

प्रखरता नियंत्रण त्वरीत ॲक्सेस करा
अधिक जलद आणि सुलभ प्रखरता समायोजनांसाठी जेव्हा तुम्ही स्क्रीनच्या वरच्या बाजूने खाली एकदा स्वाईप करता, तेव्हा प्रखरता नियंत्रण बार आता डिफॉल्टनुसार दिसतो.

सुधारित अल्बम कला प्रदर्शन
संगीत किंवा व्हिडिओस प्ले करताना, जर संगीत किंवा व्हिडिओ प्ले करत असलेला अनुप्रयोग अल्बम कला प्रदान करत असेल, तर अल्बम कला अधिसूचनामध्ये संपूर्ण मीडिया नियंत्रक झाकेल.

अधिसूचनांसाठी वर्धित लेआउट
आता प्रत्येक अधिसूचना एक स्वतंत्र कार्ड म्हणून दिसते, ज्यामुळे वैयक्तिक अधिसूचना ओळखणे सुलभ होते.

अधिक विवर्धित अधिसूचना आयकॉन
होम आणि अनुप्रयोग स्क्रीन्सवर प्रत्येक अनुप्रयोगासाठी वापरले जात असलेलेच पूर्ण-रंग आयकॉन तुम्ही वापरू शकता. हे तुम्ही सेटिंग्समध्ये चालू करू शकता.

वेळेनुसार अधिसूचनांची क्रमवारी लावा
प्राधान्याऐवजी वेळेनुसार क्रमवारी लावण्यासाठी आता तुम्ही तुमची अधिसूचना सेटिंग्स बदलू शकता, ज्यायोगे तुमच्या सर्वात नवीन अधिसूचना नेहमी वर असतील.



स्क्रीन लॉक करा

तुमचे घड्याळ रिपोझिशन करा
लॉक स्क्रीनवर तुमच्या पसंतीच्या स्थितीमध्ये तुमचे घड्याळ हलवण्यासाठी तुमच्याकडे आता अधिक स्वातंत्र्य आहे.



मुख्‍य स्‍क्रीन

सुलभीकृत आयकॉन लेबले
अनुप्रयोग आयकॉन लेबले आता अधिक स्वच्छ आणि सुलभ लुकसाठी मर्यादित आहेत. काही अनुप्रयोग लहान आणि स्कॅन करण्यास सुलभ करण्यासाठी त्यांच्या नावातून "Galaxy" आणि "Samsung" काढले गेले आहे.

दोन हातांनी ड्रॅग आणि ड्रॉप करा
तुमच्या मुख्य स्‍क्रीनवर अनुप्रयोग आयकॉन किंवा विजेट एका हाताने ड्रॅग करायला सुरुवात करा, नंतर तुम्हाला त्यांना जिथे ड्रॉप करायचे असेल तिथे नेव्हिगेट करण्यासाठी तुमचा दुसरा हात वापरा.



मल्टिटास्किंग

पॉप-अप विंडोज उघड्या ठेवा
तुम्ही अलीकडील स्क्रीनवर जाता, तेव्हा पॉप-अप विंडोज मिनिमाईज करण्याऐवजी, तुम्ही अलीकडील स्क्रीन सोडल्यावर पॉप-अप उघडे राहतील म्हणजे तुम्ही ज्यावर काम करत होतात ते चालू ठेऊ शकाल.



Samsung DeX

नवीन DeX ला भेटा
नवीन Samsung DeX मुळे तुम्हाला एकाच मुख्य स्‍क्रीन लेआउटसह DeX मोड आणि टॅबलेट मोडमध्ये स्विच करता येते. तुमचे सर्व नेहमीचे अनुप्रयोग, विजेट्स आणि आयकॉन्स DeX मध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या टॅबलेटसाठी स्‍वयं फिरवा चालू केले असल्यास, तुम्ही लँडस्केप आणि पोर्ट्रेट दोन्ही ओरीएन्टेशन्समध्ये सुद्धा Dex वापरू शकता.



Windows शी लिंक करा

आता टॅबलेट्सवर उपलब्ध
अधिसूचना तपासणे आणि तुमच्या टॅबलेटवरील अनुप्रयोग तुमच्या PC वर वापरणे, तुमच्या उपकरणांदरम्यान फाईल्स हस्तांतरण करणे आणि अधिकसाठी तुमचा टॅबलेट तुमच्या Windows PC ला कनेक्ट करा.



सॅमसंग कीबोर्ड

नवीन इमोजी डिझाईन
तुमचे मेसेज, सोशल मीडिया पोस्ट आणि तुमच्या टॅबलेटवर अन्यत्र दिसत असलेले इमोजी ताज्या नवीन डिझाईनसह अपडेट केले गेले आहेत.



सामग्री शेअरिंग

चित्र प्रिव्ह्यू
जेव्हा तुम्ही कोणत्याही अनुप्रयोगावरून चित्रे शेअर करता, तेव्हा प्रतिमा शेअर करण्यापूर्वी त्यांचे पुनरावलोकन करण्याची तुम्हाला आणखी एक संधी देण्यासाठी चित्रे प्रिव्ह्यू करा शेअर पॅनेलच्या वरच्या बाजूला दिसेल.



हवामान

नवीन हवामान विजेट
हवामान अंतर्दृष्टी विजेट तुमच्या स्थानिक हवामान स्थितींबाबत अधिक माहिती प्रदान करते. ढगांचा तीव्र गडगडाट, हिम, पाऊस आणि इतर घटनांचे भाकीत असेल तेव्हा तुम्हाला ते दिसू शकेल.

हवामान अनुप्रयोगामध्ये अधिक माहिती
हिमवर्षाव, चंद्राच्या कला आणि वेळा, वातावरणाचा दाब, दृश्यमानता अंतर, दव बिंदू आणि वाऱ्याची दिशा याबाबत माहिती आता हवामान अनुप्रयोगात उपलब्ध आहे.

परस्परसंवादी नकाशा व्ह्यू
स्थानिक हवामान स्थिती पाहण्यासाठी नकाशाच्या भोवती फिरण्यासाठी आणि स्थान टॅप करण्यासाठी स्वाईप करा. तुम्हाला शहराचे नाव माहीत नसले, तरीही हवामानाची माहिती शोधण्यास नकाशा तुम्हाला मदत करू शकतो.

वर्धित सचित्र उदाहरणे
हवामानाच्या वर्तमान स्थितींबाबत अधिक चांगली माहिती प्रदान करण्यासाठी हवामान विजेट आणि अनुप्रयोगातील सचित्र उदाहरणे वर्धित केली आहेत. दिवसाच्या वेळानुसार पार्श्वभूमी रंग सुद्धा बदलतात.



कॅमेरा

सुलभ आणि अंतर्ज्ञानी डिझाइन
कॅमेरा अनुप्रयोगाचा एकंदर लेआउट सुलभ केला गेला आहे. स्क्रीन पूर्वावलोकनवर त्वरित सेटिंग्स बटणे समजण्यास सुलभ व्हावी यासाठी पुन्हा डिझाईन केली गेली आहेत.

सानुकूल कॅमेरा विजेट्स
तुमच्या मुख्य स्‍क्रीनवर तुम्ही सानुकूल कॅमेरा विजेट्स जोडू शकता. एका विशिष्ट शूटिंग मोडमध्ये सुरू करण्यासाठी तुम्ही प्रत्येक विजेट सेट करू शकता आणि तुमच्या पसंतीच्या अल्बममध्ये चित्रे जतन करू शकता.

वॉटरमार्क्ससाठी अधिक अलाईनमेंट पर्याय
तुमचा वॉटरमार्क तुमच्या फोटोंच्या वर दिसेल का खाली हे आता तुम्ही निवडू शकता.

दस्तऐवज सहज स्कॅन करा
दस्तऐवज स्कॅन करा वैशिष्ट्य दृश्य ऑप्टिमायझरपासून वेगळे केले गेले आहे ज्यायोगे दृश्य ऑप्टिमायझर बंद केला असला, तरीही तुम्ही दस्तऐवज स्कॅन करू शकाल. नवीन स्वयं स्कॅनमुळे जेव्हाही तुम्ही दस्तऐवजाचे चित्र घेता, तेव्हा तुम्हाला स्वयंचलितपणे दस्तऐवज स्कॅन करता येतात. दस्तऐवज स्कॅन केल्यावर, तुम्हाला संपादित करा स्क्रीनवर नेले जाईल जिथे तुम्हाला हवे असल्यास अलाईन करण्यासाठी तुम्ही तुमचा दस्तऐवज फिरवू शकता.

अधिक सुलभ व्हिडिओ आकार पर्याय
तुम्ही व्हिडिओ आकार बटण टॅप करता, तेव्हा आता एक पॉप-अप दिसतो, ज्यामुळे सर्व पर्याय पाहणे आणि योग्य तो निवडणे अधिक सुलभ होते.

तुमच्या चित्राची पातळी राखा
जेव्हा कॅमेरा सेटिंग्समध्ये ग्रिड लाइन्स चालू केलेल्या असतात, तेव्हा पॅनोरामा व्यतिरिक्त सर्व मोड्समध्ये मागील कॅमेरा वापरत असताना आता स्क्रीनच्या मध्यावर पातळी रेषा दिसेल. तुमचे चित्र जमिनीच्या पातळीत आहे का हे दाखवण्यासाठी रेषा हलेल.

कॅमेरे स्विच करण्यासाठी वर/खाली स्वाईप करा बंद करा
पुढील व मागील कॅमेरांमध्ये स्विच करण्यासाठी वर किंवा खाली स्वाईप करणे आता पर्यायी आहे. अपघाताने स्वाईप होण्याची तुम्हाला चिंता वाटत असेल, तर सेटिंग्समध्ये तुम्ही हे बंद करू शकता.

प्रभाव अधिक सहजपणे लागू करा
फिल्टर आणि चेहरा प्रभाव आता स्लाईडरच्या ऐवजी डायल वापरते ज्यामुळे एकाच हाताने अचूक समायोजने करणे सोपे होते.



गॅलरी

तपशील व्ह्यूमध्ये जलद संपादने
चित्र किंवा व्हिडिओ पाहताना, तपशील व्ह्यूमध्ये जाण्यासाठी तळापासून वर स्वाईप करा. हा स्क्रीन आता तुम्ही त्वरीत लागू करू शकत असलेल्या प्रभाव आणि संपादित करा वैशिष्ट्यांचा त्वरित ॲक्‍सेस प्रदान करतो.

2 हातांनी ड्रॅग आणि ड्रॉप करा
चित्रे आणि व्हिडिओंना एका हाताने स्पर्श करा व होल्ड करा, नंतर तुम्हाला त्यांना जिथे ड्रॉप करायचे आहे त्या अल्बमवर नेव्हिगेट करण्यासाठी तुमचा दुसरा हात वापरा.

क्लिप केलेल्या प्रतिमा स्टिकर्स म्हणून जतन करा
जेव्हा तुम्ही एखाद्या प्रतिमेमधून काहीतरी क्लिप करता, तेव्हा तुम्ही ते स्टिकर म्हणून सहज जतन करू शकता जे तुम्ही नंतर चित्रे किंवा व्हिडिओस संपादित करताना वापरू शकता.

वर्धित कथा व्ह्यू
कथा पाहताना, तुम्ही स्क्रीनच्या तळापासून वर स्वाईप करता, तेव्हा एक थंबनेल व्ह्यू दिसतो. थंबनेल व्ह्यूमध्ये, तुम्ही तुमच्या कथेमध्ये चित्रे आणि व्हिडिओस जोडू शकता किंवा त्यातून काढून टाकू शकता.



फोटो एडिटर

वर्धित लेआउट
नवीन साधने मेनू तुम्हाला हवी असलेली संपादित करा वैशिष्ट्ये शोधणे अधिक सुलभ करतो. परिवर्तन मेनूमध्ये सरळ करा आणि दृष्टीकोन पर्याय जोडले गेले आहेत.

जतन केल्यावर सजावटी समायोजित करा
आता जतन केल्यानंतरही तुम्ही फोटोंमध्ये जोडलेल्या ड्रॉइंग्ज, स्टिकर्स आणि टेक्स्टमध्ये बदल करू शकता.

पूर्ववत करा आणि पुन्हा करा
चुका करण्याची चिंता करू नका. आता तुम्ही परिवर्तने, फिल्‍टर्स आणि टोन्स सहज पूर्ववत आणि पुन्हा करू शकता.

सानुकूल स्टिकर्सवर ड्रॉ करा
सानुकूल स्टिकर्स तयार करताना, तुमचे स्टिकर्स आणखी वैयक्तिक आणि अनन्य बनवण्यासाठी तुम्ही ड्रॉइंग साधने वापरू शकता.

नवीन टेक्स्ट पार्श्वभूमी आणि शैली
फोटोमध्ये टेक्स्ट जोडताना, तुम्हाला अचूक लुक मिळण्यास मदत व्हावी यासाठी तुम्ही अनेक नवीन पार्श्वभूमी आणि शैलींमधून निवड करू शकता.



स्‍टुडिओ (व्हिडिओ संपादक)

अधिक सक्षम व्हिडिओ संपादन
स्टुडिओ हा एक नवीन प्रकल्प-आधारीत व्हिडिओ संपादक आहे, ज्यामुळे अधिक गुंतागुंतीचे आणि सक्षम संपादन करता येते. गॅलरीमध्ये ड्रॉवर मेनूमधून तुम्ही स्टुडिओ ॲक्सेस करू शकता किंवा जलद ॲक्सेससाठी तुमच्या मुख्य स्‍क्रीनवर आयकॉन जोडू शकता.

वेळ मर्यादा लेआउट
स्टुडिओमुळे तुम्हाला तुमचा संपूर्ण प्रकल्प अनेक व्हिडिओ क्लिप्ससह वेळ मर्यादा म्हणून पाहता येतो. बहुस्तरीय रचनेमुळे तुम्हाला क्लिप्स, स्टिकर्स, उपशीर्षके आणि इतर घटक जोडता येतात आणि त्यांची स्थिती तसेच लांबी सहज समायोजित करता येते.

प्रकल्प जतन करा व संपादित करा
अपूर्ण चित्रपट प्रकल्प सुद्धा तुम्ही जतन.करू शकता आणि नंतर संपादित करू शकता.



व्हिडिओ प्लेअर

वर्धित लेआउट
व्हिडिओ प्लेअर नियंत्रणे आता पूर्वीपेक्षाही सुलभ झाली आहेत. समान कार्ये असलेल्या बटणांचे एकत्र समूह करण्यात आले आहेत आणि प्ले बटण स्क्रीनच्या मध्यभागी हलवले गेले आहे.

वर्धित प्लेबॅक वेग नियंत्रणे
0.25x आणि 2.0x दरम्यान अनेक व्हिडिओ प्लेबॅक वेगांमध्ये निवडा. स्लाईडरऐवजी समर्पित बटणांनी वेग नियंत्रणे ॲक्‍सेस करणे आता अधिक सुलभ आहे.



Samsung Health

मुख्य स्क्रीनसाठी नवीन लुक
Samsung Health मुख्य स्‍क्रीन पूर्णपणे सुधारीत केला गेला आहे. अधिक माहिती दाखवली जाते, तर तुम्हाला सर्वात जास्त हवी असलेली माहिती पाहणे बोल्ड फाँट्स आणि रंगांमुळे सुलभ होते. तुमचे अलीकडील व्यायाम परिणाम स्क्रीनच्या वरच्या बाजूला दाखवले जातात आणि तुमच्या झोपेच्या स्कोअरबाबत अधिक अभिप्राय, तसेच पावले, ॲक्टिविटी, पाणी व खाद्यपदार्थांसाठी तुमची दैनिक ध्येये प्रदान केली जातात.

पाण्याच्या पेल्याची आकारमाने सानुकूल करा
तुम्ही सहसा ज्या आकारमानाच्या पेल्यातून पाणी पिता त्याच्याशी जुळण्याकरिता आता तुम्ही Samsung Health Water ट्रॅकरमध्ये पेल्यांची आकारमाने सानुकूल करू शकता.



दिनदर्शिका

एका दृष्टिक्षेपात तुमचे शेड्यूल
नवीन शेड्यूल व्ह्यू तुम्हाला आगामी उपक्रम, कार्ये आणि रिमाइंडर सर्व एकत्र कालक्रमानुसार प्रदान करतो.

तुमची रिमाइंडर्स दिनदर्शिकेत पाहा
आता रिमाइंडर अनुप्रयोग न उघडता तुम्ही तुमची रिमाइंडर दिनदर्शिका अनुप्रयोगात पाहू शकता व जोडू शकता.

2 हातांनी उपक्रम हलवा
दिवस किंवा आठवडा व्ह्यूमध्ये, तुम्हाला जो उपक्रम हलवायचा आहे त्याला एका हाताने स्पर्श करा आणि होल्ड करा, नंतर तुम्हाला तो जिथे हलवायचा आहे तिथे नेव्हिगेट करण्यासाठी दुसरा हात वापरा.



रिमाइंडर

रिफाईन केलेला रिमाइंडर लिस्ट व्ह्यू
मुख्य लिस्ट व्ह्यू पुन्हा डिझाईन केला गेला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुम्ही श्रेणी व्यवस्थापित करू शकता. श्रेणींच्या खाली, तुमची रिमाइंडर्स तारखेनुसार आयोजित केलेली दाखवली जातील. प्रतिमा आणि वेब लिंक्स असलेल्या रिमाइंडर्सचा लेआउट आता वर्धित करण्यात आला आहे.

नवीन रिमाइंडर श्रेणी
स्थान श्रेणीमध्ये तुम्ही विशिष्ठ स्थानावर असताना तुम्हाला सतर्क करणारी रिमाइंडर्स असतात आणि सतर्क नाही श्रेणीमध्ये कोणतेही सतर्क प्रदान करत नसलेली रिमाइंडर्स असतात.

रिमाइंडर्स तयार करण्यासाठी अधिक पर्याय
रिमाइंडर अनुप्रयोगावर सामग्री शेअर करताना, तुमचे रिमाइंडर तयार केले जाण्यापूर्वी तुम्हाला पूर्ण संपादन पर्याय मिळतील. रिमाइंडर तयार करताना आता तुम्ही कॅमेरा वापरून चित्रे सुद्धा घेऊ शकता.

सर्व दिवस रिमाइंडर्स तयार करा
आता तुम्ही संपूर्ण दिवसासाठी रिमाइंडर्स तयार करू शकता आणि त्यांबाबत तुम्हाला सतर्क केले जावे ती वेळ सानुकूल करू शकता.



सॅमसंग इंटरनेट

पार्श्वभूमीमध्ये व्हिडिओ प्ले करा
तुम्ही वर्तमान टॅब सोडून गेलात किंवा इंटरनेट अनुप्रयोग सोडून गेलात, तरीही व्हिडिओ ध्वनी प्ले करत राहा.

मोठ्या स्क्रीन्ससाठी वर्धित टॅब लिस्ट व्ह्यू
लँडस्केप दृश्य किंवा Samsung DeXमध्ये टॅबलेट मोठ्या स्क्रीनवर इंटरनेट वापरताना, टॅब लिस्ट व्ह्यू 2 रकान्यांत दाखवला जाईल ज्यायोगे तुम्हाला एकाच वेळी स्क्रीनवर अधिक माहिती पाहता येईल.

2 हातांनी पृष्ठचिन्हे आणि टॅब्ज हलवा
तुम्हाला जे पृष्ठचिन्ह किंवा टॅब हलवायचा आहे त्याला एका हाताने स्पर्श करा आणि होल्ड करा, नंतर तुम्हाला ते जिथे हलवायचे आहे त्या पृष्ठचिन्ह फोल्डरमध्ये किंवा टॅब समूहात नेव्हिगेट करण्यासाठी तुमचा दुसरा हात वापरा.



स्‍मार्ट निवड

पिन केलेल्या सामग्रीतून मजकूराचा आकार बदला आणि एक्सट्रॅक्ट करा
जेव्हा तुम्ही स्क्रीनवर प्रतिमा पिन करता, तेव्हा आता तुम्ही तिचा आकार बदलू शकता किंवा त्यातून मजकूर एक्सट्रॅक्ट करू शकता.

मॅग्निफाईड व्ह्यू
स्क्रीनचा एक भाग निवडताना, एक मॅग्निफाईड व्ह्यू दिसेल ज्यायोगे तुम्हाला तुमची निवड अचूक बिंदूवर सुरू व समाप्त करता येईल.



Bixby text call

कॉल दरम्यान Bixby ला स्विच करा
तुम्ही कधीही Bixby text call वर स्विच करू शकता, कॉल आधीच प्रगतीपथावर असताना सुद्धा.



मोड आणि रूटीन

तुमच्या लॉक स्क्रीनचे स्वरूप बदला
तुम्ही ड्राइव्ह करत असाल, काम, व्यायाम आणि अधिक काही करत असाल, तेव्हा स्वतःचे वॉलपेपर आणि घड्याळ शैलीसह भिन्न लॉक स्क्रीन सेट करा. झोप मोडसाठी एक डार्क वॉलपेपर किंवा रिलॅक्स मोडसाठी एक शांत करणारा वॉलपेपर वापरून पाहा. जेव्हा तुम्ही एखाद्या मोडसाठी लॉक स्क्रीन संपादित कराल, तेव्हा तो मोड जेव्हाही चालू केला जाईल, तेव्हा तुम्हाला तो वॉलपेपर दिसेल.

नवीन स्थिती
एखादा अनुप्रयोग मीडिया प्ले करत असताना आता तुम्ही एक रूटीन सुरू करू शकता.

नवीन कृती
तुमची रूटीन्स आता पूर्वीपेक्षा अधिक करू शकतात, जसे की तुमची सॅमसंग कीबोर्ड सेटिंग्स बदलणे.



स्मार्ट सूचना

नवीन लुक आणि फील
स्मार्ट सूचना विजेटची अशा लेआउटसह पुन्हा रचना केली गेली आहे जो तुमच्या मुख्य स्‍क्रीनवरील इतर आयकॉन्ससह जास्त चांगला संरेखित होतो.

अधिक सानुकूल करणे
आता तुम्ही पारदर्शकता समायोजित करू शकता आणि पांढऱ्या व काळ्या पार्श्वभूमीमध्ये निवड करू शकता. सूचनांमधून वगळण्यासाठीही तुम्ही अनुप्रयोग सेट करू शकता.



Finder

अनुप्रयोगांसाठी जलद कृती
जेव्हा एखादा अनुप्रयोग तुमच्या शोध निकालांत दिसतो, तेव्हा अनुप्रयोग वापरून तुम्ही ज्या कृती करू शकता त्यांचा त्वरित ॲक्‍सेस मिळवण्यासाठी तुम्ही अनुप्रयोगास स्पर्श करून होल्ड करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही दिनदर्शिका अनुप्रयोग शोधत असाल, तर एखादा उपक्रम जोडण्यासाठी किंवा तुमची दिनदर्शिका शोधण्यासाठीची बटणे दिसू लागतील. जर तुम्ही अनुप्रयोगाऐवजी कृतीचे नाव शोधले, तर अनुप्रयोग कृती सुद्धा आपल्या आपण शोध निकालांत दिसू लागतील.



माय फाईल्स

संग्रह जागा मोकळी करा
संग्रह जागा मोकळी करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी शिफारस कार्डे दिसू लागतील. माझ्या फाइल्स अनावश्यक फाइल्स हटवण्याची शिफारस करेल, क्‍लाउड संग्रह सेट करण्यासाठी तुम्हाला टिपा देईल, तसेच तुमच्या टॅबलेटवरील कोणता अनुप्रयोग सर्वाधिक संग्रह वापरत आहे हे तुम्हाला कळू देईल.

गॅलरी आणि आवाज रेकॉर्डरसह एकात्मित ट्रॅश
माझ्या फाइल्स, गॅलरी आणि आवाज रेकॉर्डर ट्रॅश वैशिष्ट्ये एकात जोडली गेली आहेत. जेव्हा तुम्ही माझ्या फाइल्समध्ये ट्रॅश उघडता, तेव्हा तुम्ही सर्व एकत्रितपणे हटवलेल्या फाइल्स, चित्रे, व्हिडिओस आणि आवाज रेकॉर्डिंग तुम्हाला दिसतील, तसेच त्यामध्ये पूर्वस्थित करण्याचा किंवा कायमचे हटवण्याचे पर्याय असतील.

2 हातांनी फाइल्स कॉपी करा
तुम्हाला जी फाइल कॉपी करायची आहे तिला एका हाताने स्पर्श करा आणि होल्ड करा, नंतर तुम्हाला ती जिथे कॉपी करायची आहे त्या फोल्डरमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी तुमचा दुसरा हात वापरा.



Samsung Pass

पासकींसह अधिक सुरक्षित साइन इन्स
अनुप्रयोग आणि वेबसाइट्सना समर्थन देण्यासाठी साइन इन करण्याकरिता पासकी वापरा. पासवर्ड्सच्या विपरीत, तुमची पासकी केवळ तुमच्या टॅबलेटवरच संग्रहित केली जाते आणि वेबसाइट सुरक्षा उल्लंघनाद्वारे ती लीक होऊ शकत नाही. पासकी तुमचे फिशिंग हल्ल्यांपासूनही संरक्षण करतात कारण त्यांची ज्या वेबसाइट किंवा अनुप्रयोगावर नोंदणी झाली असेल, तिथेच त्या कार्य करतात.



सेटिंग्स

अधिक चाणाक्ष एअरप्लेन मोड
एअरप्लेन मोड चालू असताना तुम्ही Wi-Fi किंवा ब्लुटूथ चालू केल्यास, तुमचा टॅबलेट ते लक्षात ठेवेल. पुढील वेळी तुम्ही एअरप्लेन मोड वापराल, तेव्हा Wi-Fi किंवा ब्लुटूथ बंद करण्याऐवजी चालू राहील.

बॅटरी सेटिंग्सचा अधिक सुलभ ॲक्सेस
बॅटरी सेटिंग्समध्ये आता आपला स्वतःचा उच्च-पातळीवरील सेटिंग्स मेनू आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा बॅटरीचा वापर सहज तपासू शकता आणि बॅटरी सेटिंग्स व्यवस्थापित करू शकता.

सुरक्षा धोके ब्लॉक करा
तुमचे अनुप्रयोग आणि डेटासाठी एक अतिरिक्त पातळीवरील संरक्षण मिळवा. स्वयं ब्लॉकर अज्ञात अनुप्रयोग इनस्टॉल होण्यास प्रतिबंध करतो, मालवेअरवर नियंत्रण ठेवतो आणि USB केबल वापरून तुमच्या टॅबलेटवर दुर्भावनापूर्ण आज्ञा पाठवल्या जाणे ब्लॉक करतो



ऍक्सेसेबिलिटी

दृष्टी वर्धने शोधणे अधिक सुलभ
स्पोकन सहाय्यक आणि दृश्‍यमानता सुधारणा मेनू जलद, सुलभ ॲक्सेससाठी एका दृष्टी वर्धने मेनूमध्ये जोडला गेला आहे.

नवीन विवर्धन पर्याय
तुमची विवर्धन विंडो कशी दिसते ते सानुकूल करा. तुम्ही पूर्ण स्क्रीन, आंशिक स्क्रीन निवडू शकता किंवा दोनमध्ये स्विच करण्यास अनुमती देऊ शकता.

कर्सरची जाडी सानुकूल करा
मजकूर संपादित करताना दिसणाऱ्या कर्सरची जाडी आता तुम्ही वाढवू शकता ज्यायोगे तो दिसणे सुलभ होते.

ॲक्‍सेसिबिलिटीबाबत अधिक जाणून घ्या
ॲक्सेसेबिलिटी सेटिंग्समध्ये Samsung Accessibility वेब पेजची एक लिंक जोडली गेली आहे ज्यायोगे तुम्हाला ॲक्‍सेसिबिलिटी वैशिष्ट्ये आणि आमची उत्पादने सर्वांसाठी ॲक्सेस करण्यायोग्य करण्यासाठीचे आमचे प्रयत्न याबाबत अधिक जाणून घेता येईल.



डिजीटल स्वास्थ्य

वर्धित लेआउट
डिजीटल स्वास्थ्याच्या मुख्य स्क्रीनची पुन्हा रचना केली गेली आहे, ज्यायोगे तुम्हाला हवी असलेली माहिती शोधणे अधिक सुलभ होईल.

तुमच्या साप्ताहिक अहवालात अधिक सामग्री
तुमचा साप्ताहिक वापर अहवाल आता तुम्हाला वापराच्या असामान्य पॅटर्नबाबत, सर्वोच्च वापराच्या वेळा आणि तुम्ही तुमचा स्क्रीन वेळ कसा संतुलित करू शकता याबाबत तुम्हाला समजू देतो.